भाऊ-बहिणीच्या नात्याला काळीमा; चुलत भावानेच बहिणीसोबत केले धक्कादायक कृत्य….

0

 

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

राज्यासह जळगाव जिल्ह्यात अल्पवयीन मुलींवर होणारे वाढतांना दिसत आहे. अशातच भाऊ-बहिणीच्या नात्याला काळीमा फासणारी एक घटना पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव (हरेश्वर) पोलिस स्टेशन हद्दीतील गावात उघडकीस आली आहे. भाऊ-बहिणीचं नातं खूप पवित्र मानलं जातं. पण हेच नातं कलंकित केल्याची घटना घडली आहे. तरुणाने चुलत बहिणीसोबत रात्री झोपेत असतांना अश्लील कृत्य केल्याची घटना घडली आहे.

सुट्यांमध्ये आजीकडे आलेल्या १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच संशयित चुलत भावाने जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. याबाबत पिंपळगाव (हरेश्वर) पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छत्रपती संभाजी नगर येथे राहणारी १३ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही उन्हाळ्याच्या सुट्टीत आजीकडे आलेली होती. त्यावेळी तिच्या चुलत भावाने ५ मे रोजी ११ वाजता पिडीत मुलगी ही झोपलेली असतांना अचानक तिच्याजवळ झोपला व अश्लील चाळे करून तिचा विनयभंग करून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार पिडीत मुलीने तिच्या नातेवाईकांना सांगितला. दरम्यान, पिडीत मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून चुलत भाऊ याच्या विरोधात पिंपळगाव (हरेश्वर) पोलीस ठाण्यात बालकांचे लैगिक अपराधापासून संरक्षण सन – २०१२ पास्को अंतर्गत ३५४/८/१२ कलम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक महेंद्र वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल पवार करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.