संशयाचे भूत मागुटीवर स्वार; सख्ख्या भावानेच केले बहिणीला ठार…

0

 

भंडारा, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

बहिण भावाच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी घटना भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील सोनूली येथे घडली आहे. सख्खा बहिणीच्या चारित्र्यांच्या संशयावरुन सख्ख्या भावाने तिची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांना आरोपी भावाविरुद्ध गुन्हा दाखल करत अटक केली आहे. आशिष गोपीचंद बावनकुळे (20) असं आरोपी भावाचं नाव आहे. तर अश्विनी बावनकुळे (20) असं मृतक बहिणीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आशिषचा आपली बहीण अश्विनी हिच्या चारित्र्यावरुन संशय घेत होता. त्यामुळे त्यांच्यात जोरदार भांडण झालं. त्या वादावादीत अश्विनी देखील आशिषला प्रत्युत्तर देत होती. यानंतर संतापलेल्या आशिषने अश्विनीने बेदम मारहाण केली. या मारहाणीतच अश्विनीचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी घटने बाबत गुन्ह्याची नोंद करुन आरोपी आशिष बावनकुळे याला अटक केली असून पुढील तपास पोलीस करत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.