कर्तव्यदक्ष आमदार सुरेश उर्फ राजूमामा भोळे यांचा आज वाढदिवस

0

भाजप पक्षाचा अत्यंत साधा कार्यकर्ता, नगरसेवक, आमदार तसेच पक्षाचे जिल्हाध्यक्ष अशी त्यांची वाटचाल.. या वाटचालीत अनेक गोष्टींचा सामना करत त्यांनी यश मिळवले.

सामाजिक कार्याची प्रचंड आवड असल्याने भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते म्हणून त्यांनी सामाजिक कार्य सुरू ठेवले. आणि याच समाजकार्याच्या बळावर ते जळगाव नगरपालिकेचे नगरसेवक, महापालिकेचे भाजपचे विरोधी पक्षनेते झाले. 2014 मध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपने त्यांना जळगाव विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आणि ते विजयी झाले. या कार्यकाळात त्यांनी अनेक कामे करत जळगाव शहराचा विकास केला.

तसेच 2019 मध्येही विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी मिळाली आणि ते दुसऱ्यांदा आमदार म्हणून विजयीही झाले. त्यानंतर भारतीय पक्षाने त्यांना जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी दिली.

आमदार राजूमामा भोळे यांचे व्यक्तिमत्त्व अत्यंत साधं मनमिळाऊ असल्याने आपसूकच लोक त्यांच्याशी लवकर जोडले जातात. मातीमध्ये घट्ट पाय रोवून स्वाभिमानाने ताठ मान घेऊन जळगावातील सामान्यातल्या सामान्य माणसांच्या मनात त्यांनी आपली भक्कम जागा निर्माण केली आहे. शहर असो वा ग्रामीण, गरीब असो वा श्रीमंत अशी कोणतीच भिंत न ठेवता समाजाशी एकनिष्ठता ठेवत लोकांच्या दुःखात आधारवड बनून तसेच त्यांच्या सुखात आनंदात सहभागी होतात. एखादं लग्नकार्य असो वा भजन संध्या असो अनेक कार्यक्रमांना ते न चुकता हजेरी लावतात. यामुळे त्यांनी तळागाळातील जनमानसात आपले नाव कोरले आहे.

जळगाव शहराला सुंदर बनवण्यासाठी विविध उपाययोजना, काश्मीर सारखा गंभीर प्रश्न असलेल्या हुडकोचं कर्ज फेडून त्यांनी जळगाव महानगरपालिकेला कर्जमुक्त केले. समाजात सलोखा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अहोरात्र काम करणाऱ्या पोलिसांसाठी हक्काची सर्व सुविधायुक्त घरे बांधून दिली. शिवाजीनगर पूल, रिंगरोड पुल, शहरातून जाणारा महामार्ग, रस्त्यांसाठी 100 कोटींचा निधी अशा कितीतरी न सांगता येणाऱ्या गोष्टी आमदार राजूमामा भोळे यांनी केल्या. यातून त्यांचे जळगाव प्रतीचे असलेले प्रेम दिसून येते.

असे नावलौकिक असलेले प्रतिभासंपन्न, जनमानसात रुजलेले, समाजकार्यासाठी झोकून दिलेले, जळगाव शहराचे मामा म्हणून प्रख्यात असलेले आमदार सुरेश भोळे यांना श्री कन्स्ट्रक्शन आणि इन्फ्रास्ट्रक्चर जळगावचे प्रोप्रायटर गौरव राजेश पाटील यांच्यातर्फे जन्मदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.. लोकसेवेसाठी ईश्वर आपणास बळ देवो, आपली राजकीय कारकिर्द अशीच प्रगल्भ राहो, आपणास उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना..

– श्री कन्स्ट्रक्शन आणि इन्फ्रास्ट्रक्चर जळगावचे प्रोप्रायटर गौरव राजेश पाटील 

 

Leave A Reply

Your email address will not be published.