सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणी अखेर शार्पशूटर अटकेत

0

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क 

काही दिवसांपूर्वी  गायक सिद्धू मुसेवाला याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या प्रकरणी पुणे पोलिसांनी एका शार्पशूटरला अटक केली आहे. गुजरातमधून या शार्पशूटरला अटक करण्यात आली असून रात्री उशिरा त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं. पुढच्या तपासासाठी न्यायालयाने त्याला २० जूनपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे.

गेल्या आठवड्यात सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणात संतोष जाधव आणि सौरभ महाकाल यांची नावं पंजाब पोलिसांनी जाहीर केली होती. त्यापैकी महाकाल याला संगमनेर जवळून अटक केली होती. त्यासाठी पंजाब पोलिसांचं पथक पुण्यात आलं होतं. तर आता संतोष जाधवला पुणे पोलिसांच्या पथकाने गुजरातमधून अटक केली आहे.

संतोष जाधव हा पुण्यातल्या आंबेगाव तालुक्यातल्या पोखरी इथला रहिवासी आहे. तो पोलिसांच्या रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे. काही दिवसांपूर्वी एका खून प्रकरणात त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. जाधव हा पुण्यातून दूर हरियाणा, राजस्थानला जाऊन आपली गुन्हेगारी टोळी तयार करत होता. ओंकार उर्फ राण्या बाणखेले व पंजाब राज्यातील गायक सिद्धू मूसेवाला या दोन हत्याप्रकरणी सराईत गुन्हेगार संतोष सुनील जाधव (वय 20, रा. पोखरी तालुका आंबेगाव सध्या मंचर) याला अटक केली आहे.

त्यासोबत गुन्हेगाराला आश्रय दिल्याच्या आरोपावरून नवनाथ सुरेश सुर्यवंशी (वय 28, रा. विखळे ता. खटाव जि. सातारा सध्या रा. कच्छ ता. मांडवी जि. भुज) यालाही अटक करण्यात आली आहे. मंचर पोलीस ठाण्यात राण्या बाणखेले याची हत्या दिड वर्षापूर्वी भरदिवसा गोळ्या घालून करण्यात आली होती. या प्रकरणी मंचर पोलीस ठाण्यात 459/2021 भादवि 302 , १२० , (ब) 34 ,212आर्म अँक्ट 3 (25) (27) mcoc 3 (i) (ii) 3 (2) 3 (3) ( ४) असे गुन्हे दाखल आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.