बिल्किस बानोची आता सर्वोच्च न्यायालयात धाव…

0

 

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क:

२००२ च्या गुजरात दंगलीतील (Gujarat riots) सामूहिक बलात्कार (gang rape) आणि तिच्या कुटुंबाच्या हत्येप्रकरणी दोषी ठरलेल्या ११ जणांच्या निर्दोष सुटकेला बिल्किस बानो यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

बिल्किस बानो यांनी दोषींच्या सुटकेविरोधात दोन याचिका दाखल केल्या आहेत. पहिल्या याचिकेत 11 दोषींच्या सुटकेला आव्हान देण्यात आले असून या सर्वांना तात्काळ तुरुंगात पाठवण्याची मागणी करण्यात आली आहे. तर दुसरी याचिका सर्वोच्च न्यायालयाच्या मे महिन्याच्या आदेशावरील पुनर्विचार याचिका आहे. या याचिकेत म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयाने त्या निर्णयावर पुनर्विचार करावा, ज्यात गुजरात सरकार दोषींच्या सुटकेचा निर्णय घेईल, असे म्हटले होते. यासाठी योग्य सरकार महाराष्ट्र सरकार असल्याचे बिल्किसने म्हटले आहे. कारण या खटल्याची सुनावणी महाराष्ट्रात सुरू होती.

सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) लवकर सुनावणी व्हावी, अशी मागणीही बिल्किसच्या वतीने करण्यात आली आहे. सीजेआय डीवाय चंद्रचूड यांनी या प्रकरणी सुनावणी कधी करता येईल ते पाहू, असे आश्वासन दिले. दोन्ही याचिकांवर एकत्रित सुनावणी करता येईल का, या मुद्द्यावर ते तपासणार असल्याचे सीजेआय यांनी म्हटले आहे. त्यांची एकाच खंडपीठासमोर सुनावणी होऊ शकते का? हेही ते पाहणार आहेत.

2002 च्या दंगलीत जेव्हा बिल्किस बानोवर (Bilkis Bano) सामूहिक बलात्कार झाला तेव्हा ती 21 वर्षांची होती. एवढेच नाही तर त्यांच्या तीन वर्षांच्या मुलीसह तिच्या कुटुंबातील नऊ जणांचीही हत्या करण्यात आली होती. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या (Gujarat Assembly Elections) मतदानापूर्वी बिल्किसच्या वतीने आज सर्वोच्च न्यायालयात ही याचिका दाखल करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.