जळगाव महापालिका आयुक्तपदी देविदास पवार

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

महापालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड (Municipal Commissioner Dr. Vidya Gaikwad) यांची अवघ्या सहा महिन्यातच बदली झाली आहे. त्यांच्या जागी परभणीचे आयुक्त देविदास पवार हे सूत्र हाती घेणार आहेत.

डॉ. गायकवाड यांची ५ मे रोजी अतिरिक्त आयुक्तपदावरून आयुक्तपदी बढती झाली होती. सहा महिने २४ दिवसांतच त्यांची बदली झाली. तर देविदास पवार हे मे २०२७ मध्ये सेवानिवृत्त होणार आहेत.

आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्या बदलीचे आदेश नगरविकास खात्यातर्फे काढण्यात आले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून आयुक्तांच्या बदलीचे वारे वाहू लागले होते. विशेष करून त्यांच्या कार्यशैलीवर भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक व नेते नाराज होते. तर अलीकडेच महापौरांनी देखील त्यांच्या कामाबाबत नाराजी व्यक्त केली होती. यामुळे त्यांची बदली करण्यात आल्याचे वृत्त आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.