भडगाव; ई-पॉस मशीनच्या अडचणींबाबत स्वस्त धान्य दुकानदारांचे तहसीलदारांना निवेदन…

0

 

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

भडगाव तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांच्या (Cheap grain shopkeeper) वतीने आज भडगाव तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. (A statement was given to the Tehsildar)

या निवेदनात म्हटले आहे की, मागील सहा महिन्यापासून भडगाव तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांना ई- पॉस मशीन धान्य वाटप करताना खूप अडचणी येत आहे. त्यात प्रमुख्याने सर्व्हर नेहमी डाऊन असते, त्यामुळे मशीन वारंवार चालू बंद करावे लागते. दिवसभर मशीन चालत नाही त्यामुळे लाभार्थी व दुकानदारांमध्ये नेहमी वाद होत असतात. त्यामुळे दुकानदार बंधु हे तांत्रिक अधिकारी यांना कळवतात त्यानंतर अधिकारी यांच्या कडून नेहमी थोड्या वेळाने प्रयत्न करून पहा असे उत्तर मिळते तसेच त्यांचा मेसेज येतो की मी एन.आय.सी कंपनी ला कळविले आहे. ग्राहक दिवसभर दुकानावर बसून रोजंदारी बुडवून घरी राहतात तरी संध्याकाळपर्यंत मशीन चालू होत नाही. आणि कोणी मार्गदर्शनही करत नाही यामुळे ग्राहक हे दुकानदारांशी भांडण करतात, वाद-विवाद होत असतात त्यामुळे दुकानदारांची प्रतिमा मलिम होत आहे.

त्यामुळे आमच्या निवेदनाचा सहानुभूतीपूर्वक वरिष्ठांना आपल्या स्तरावरून कळविण्यात यावे तसेच राज्यातील स्वस्त धान्य दुकानदारांचे झिरो आधार सिडींग व नाँन सिडेड आधार रेशन कार्ड बंद करून त्याऐवजी उर्वरीत इष्टांक ताबडतोब दुकान निहाय भरून देण्यात यावा, तसे निर्देश आपण आपल्या स्तरावरून संबंधित अधिकारी यांना कळविण्यात यावे, जेवढे आधार दुकान निहाय कमी होतील तेवढा इष्टांक तात्काळ भरून मिळावा. या आशयाचे निवेदन भडगाव तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेतर्फे आज भडगाव नायब तहसीलदार रमेश देवकर यांना देण्यात आले.

यावेळी स्वस्त धान्य दुकानदार (Cheap grain shopkeeper) संघटनेचे भडगाव ता.अध्यक्ष जयवंत पाटील, उपाध्यक्ष आंनदा सोनवणे, सचिव लक्ष्मण पाटील, यांच्यासह भडगाव तालुक्यातील सर्व दुकानदार उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.