माझ्या डोक्यावर जितके केस तितकी आंदोलने केली ; छगन भुजबळांचा जरांगे पाटलांना टोला

0

हिंगोली ;– ते नवीन नेते आता नवीनच काहीतरी बोलू लागले आहेत. भुजबळ म्हातारे झालेत असं काल म्हणाले. अरे बाबा हो! झालोय म्हातारा, सगळेच होणार आहेत. तुझे माता-पिता म्हातारे झाले असतील. तूसुद्धा म्हातारा होशील.” भुजबळ यावेळी डोक्यावरचे केस पकडून म्हणाले, मला म्हातारा म्हणतोय, पण माझ्या डोक्यावरचे केस एका आंदोलनाने पिकले नाहीत. माझ्या डोक्यावर जेवढे केस आहेत तेवढी आंदोलनं मी केली आहेत. मी कधी जीवाची पर्वा केली नाही. आंदोलन माझ्यासाठी नवीन नाही.अशी खरपूस टीका मनोज जरांगे पाटील यांचे नाव न घेता घागा भुजबळ यांनी आज हिंगोली येथे आयोजित ओबीसी एल्गार सभेत केली.

मनोज जरंगे पाटील यांनी भुजबळ यांच्यावर टीका करताना म्हटले होते कि, टोळी मुकादम म्हातारा झाला तरी खूप गडबड चालू आहे”.त्याला घरी बसवल्याशिवाय शांत बसणार नाही,अशी टीका केली होती. या टीकेला छगन भुजबळ यांनी आज हिंगोली येथे झालेल्या सभेत उत्तर देत म्हणाले कि,

या लोकांनी बीड पेटवलं. यांना मला सांगायचं आहे की पेटवायला अक्कल लागत नाही, पटवायला अक्कल लागते. जाळायला अक्कल लागत नाही, जुळवायला अक्कल लागते. मोडायला अक्कल लागत नाही, घडवायला अक्कल लागते.असे वक्तव्य टीकास्त्र भुजबळ यांनी सोडले.

Leave A Reply

Your email address will not be published.