धुळ्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची जोरदार हजेरी

0

धुळे, लोकशाही न्यूज नेटवर्क

आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण अनुभवायला मिळत आहे. या दरम्यान आज दुपारी विजांच्या गडगडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. अवकाळी पावसामुळे रब्बीच्या पिकांना फायदा होणार असला तरी, शेतात असलेल्या कापूस व भट पिकांचे नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या अडचणीत वाढ होऊ शकते.

हवामान खात्यातर्फे राज्यातील काही भागात तीन दिवस अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. अंदाजानुसार आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण अनुभवायला मिळत आहे. दरम्यान धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील विविध ठिकाणी दुपारची एक ते दीड वाजेच्या सुमारास विजांच्या गडगडासह जोरदार पावसाने हजेरी लावली आहे, अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली. शिवाय सकाळपासूनच हवेत देखील गर्व निर्माण झाला आहे.

शेतीला मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसामुळे नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. काढणीला आलेल्या कापूस पिकाचे, त्याचबरोबर काढनीला आलेल्या भात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची देखील भीती व्यक्त करण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.