चंद्रकांत पाटलांच्या बेताल वक्तव्याचा पाचोऱ्यात निषेध…

0

 

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क:

राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी थोर पुरुषांबद्दल केलेल्या बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ आज १० डिसेंबर रोजी पाचोरा येथील अ.भा. महात्मा फुले समता परिषद व सर्व सामाजिक संघटनांतर्फे तिव्र निषेध व्यक्त करण्यात आला. शहरातील कृष्णापुरी येथुन चंद्रकांत पाटील यांची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढून छत्रपती शिवाजी महाराज चौकात पुतळ्यास जोडे मारत तिव्र निषेध जाहिर करण्यात आला. तसेच निषेधार्थ निवेदन तहसिलदार यांना देण्यात आले.

याप्रसंगी समता सैनिक दलाचे किशोर डोंगर, अ.भा. महात्मा फुले समता परिषदेचे शहराध्यक्ष कन्हैया देवरे, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष सुनिल पाटील, राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चाचे सुनिल शिंदे, आर.पी.आय.चे शशिकांत मोरे, मा. नगरसेवक वासुदेव महाजन, अशोक मोरे, सुदर्शन महाजन, विनोद खरे, संतोष महाजन, जिभु पाटील, चिंधु मोकळ, हरिष आदिवाल, मधुकर महाजन, अनंत बागुल, के. एस. महाजन, नाना महाजन, बबलु महाजन किशोर बारावकर, गोविंदा अहिरे, ज्ञानेश्वर महाजन, आनंदा महाजन, आबा महाजन, चिंतामण जाधव, शांताराम खैरे, नथ्थु महाजन, नितीन महाजन, कमलाकर महाजन, अशोक निंबाळकर, चेतन महाजन, भगवान महाजन, विठ्ठल महाजन (माऊली), भागवत महाजन, रघुनाथ महाजन यांचेसह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांनी “या चंपाबाईचे करायचे काय, खाली डोकं वरती पाय, “चंद्रकांत पाटील हाय हाय” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता. प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे मारत पुतळा फुंकण्यात आला. तसेच निषेधार्थ निवेदन तहसिलदार यांना देण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.