नागपूरमध्ये वास्तु आरोग्यमचा डंका…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

संस्कृत सखी सभा, नागपूरच्या वतीने गीता जयंतीनिमित्त भव्य-दिव् असा संपूर्ण (अठरा अध्याय) महिलांद्वारा होणारे गीता पठण महायज्ञ खासदार सांस्कृतीक महोत्सवांतर्गत स्वतंत्र मंचावर नागपूर येथे रविवार ४ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता.

सदर गीता पठणदरम्यान जळगाव येथील वास्तुआरोग्यमचे संस्थापक व ऊर्जा तज्ज्ञ डॉ. अविनाश कुळकर्णी व त्यांच्या कन्या सौ. आकांक्षा कुळकर्णी यांना मंत्रांच्या ध्वनीलहरींचे ऊर्जा अध्ययन करण्यासाठी खास आमंत्रित करण्यात आले होते. हे ऊर्जा अध्ययन रशियन टेकनॉलॉजी बायोवेल कॅमेरा व स्फुटनिक एन्टीना याच्या सहाय्याने करण्यात आले. गीतापठण सुरू होण्यापूर्वीची ऊर्जा, पठण सुरू असतानाची ऊर्जा व पठण संपल्यानंतरची ऊर्जा याचे मापन करण्यात आले. तसेच सदर गीता पठणासाठी उपस्थित महिलांमधून सुमारे २० महिलांचे देखील ऊर्जा अध्ययन करण्यात आले.

दय्म्यान महायज्ञाचे उद्घाटन श्रीनाथ पीठ, श्री देवस्थान मठ, श्री क्षेत्र अंजनगाव सुर्जीच्या रेणुका मायबाई यांचेहस्ते करण्यात आले. यावेळी राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का, सामाजिक कार्यकर्त्या सौ. कांचन नितीन गडकरी, संस्कार भारती गीता परिवार, राष्ट्रसेविका समिती, शक्तीपीठ गायत्री महिला, भारतीय स्त्रीशक्ती आयुर्वेद महाविद्यालय, विश्व मांगल्य सभा, कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ, केशवनगर विद्यालय यांचेसह अनेक शाळा, महाविद्यालयांच्या प्रतिनिधींची उपस्थिती होती. या अध्ययनासाठी जळगाव वास्तु आरोग्यमचे डॉ. अविनाश कुळकणी, सौ. आकांक्षा कुलकर्णी, ठाणे येथील सौ. अश्विनी देशपांडे, मनिष अग्रवाल हे सहभागी होते.

या भव्य अशा गीतापठण कार्यक्रमात सुमारे ४ हजार महिलांनी सामुहिक गीता पठण केले. हा जगभरातील पहिलाच असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता व त्यासाठीच याचे ऊर्जा अध्ययन करणे जरूरी होते. त्यासाठीच जळगावचे ऊर्जा तज्ज्ञ डॉ. अविनाश कुलकर्णी व सौ. आकांक्षा निखील कुलकर्णी यांना खास आमंत्रित करण्यात आले होते. यामुळे जळगावच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला गेला. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची देखील विशेष उपस्थिती होती.

Leave A Reply

Your email address will not be published.