गिरणा पात्रात झालेल्या आशिष शिरसाळे खुनाचा छडा… आरोपींनी कबुल केला गुन्हा…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

धरणगांव पोलीस स्टेशन अंतर्गत पाळधी पोलीस दूरक्षेत्र हददीत दि. २३ जून रोजी रात्री सुमारे ९.30 च्या दरम्यान बांभोरी येथे राहणारा आशिष ऊर्फ बाळा प्रकाश शिरसाळे (२२) याचा गिरणा नदी किनारी अज्ञात इसमाने धारदार शस्त्राने डोक्यावर, कपाळावर व डाव्या कानावर मोठया जखमा करून जिवे ठार मारल्याची घटना घडली होती. या घटनेबाबत मयताचे वडिल प्रकाश आनंदा शिरसाळे (५०) यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन धरणगांव पोलीस स्टेशनला भाग. ५ गुरनं. २०४/२०२३ भादवि कलम ३०२ प्रमाणे अज्ञात आरोपीताविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान घटनास्थळी मा. रमेश चोपडे, अपर पोलीस अधिक्षक चाळीसगांव भाग, मा. कृषिकेश रावले- सहाय्यक पोलीस अधिक्षक चोपडा विभाग, उच्दव ढमाळे- पोलीस निरीक्षक यांनी भेट दिली होती. त्यानंतर त्यांचे मार्गदर्शनाखाली संशयीत आरोपी प्रमोद ऊर्फ छोटू भिमराव नन्नवरे, (३४) रा. बांभोरी प्रचा ता. धरणगांव व त्याच्या सोबत अमोल विक्रम पाटील(३४) रा. कल्याणी नगर दादावाडी जळगाव यांना नळदुर्ग पोलीस स्टेशन जि. उस्मानाबाद येथून ताब्यात घेत्न्यात आले आहे. संशयीत आरोपी प्रमोद ऊर्फ छोटू भिमराव नन्नवरे याला पोलिसांनी विचारपूस केली असता त्याने सांगीतले की, मयत आशिष प्रकाश शिरसाळे हा त्याचे पत्नीस अश्लील हावभाव करुन वारंवार त्रास देत होता, त्याचा राग आल्याने त्यास दि. २३.०६.२०२३ रोजी रात्री ०९.०० वा. सुमारास घराचे समोरुन गिरणा नदी पात्राकडे एकटा जातांना पहिले. आणि त्याच्या पाठीमागे जावून त्याच्या डोक्यावर वार केला. आणि त्यानंतर तेथून पळून गेल्याचे सांगून आरोपीने गुन्हयाची कबुली दिली. दरम्यान आरोपी प्रमोद ऊर्फ छोटू भिमराव नन्नवरे यास दि. २६.०६.२०२३ रोजी ०१.२१ वा. अटक करून धरणगांव न्यायालयात हजर केले असता त्याला ४ दिवस पोलीस कस्टडी रिमांड मध्ये पाठवण्यात आले आहे. सदर गुन्हयाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद कठोरे हे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.