जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:
शहरातील व जिल्ह्यातील कष्टकरी घरकामगारांच्या व शेतात मजुरी करणाऱ्या महिलांच्या मागण्यांसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येऊन विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
आज दि. २६ सोमवार रोजी जळगाव शहरातील व जिल्ह्यातून जळगाव खुर्द, नशिराबाद, निमगांव, सुनसगाव, नेरी दिगर, मोहाडी, पळासखेडे, देवपिंप्री, नवी दाभाडी, पहुर पाळधी, नाचणखेडा, पिंपळकोठा, करंज भोकर, विदगांव, कठोरा, तुरखेडा, वर्डी, गोरगावले, साक्री, रावेर, रसलपुर, डामुर्णी, ठिकसाई, फुफणी, शिरसोली, जवखेडा, सावखेडे, कळमसरे, पिलखेडा, गोलवाडे, बलवाडी इत्यादी ग्रामीण भागातून घरकामगार व कष्टकरी शेतमजूर महिला यांचा मोर्चा खान्देश कामगार संघटना संलग्न महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक महासंघाचा मोर्चा विकास अळवणी व उदय भट यांच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यांसाठी काढण्यात येऊन विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे कि, स्वयंपाकाच्या गॅसच्या किंमती कमी करून तो सर्व कष्टक-यांना रुपये ३००/- प्रति सिलेंडर या प्रमाणे देण्यांत यावा.कष्टकरी घरकामगार व शेतात मजुरी करणाऱ्या महिलांच्या मुलांना मोफत शिक्षण मिळावे. कष्टकरी घरकामगार व शेतमजूर महिला शेतात मजूरीचे काम करुन त्यांना जेमतेम रुपये १५०/- रोज मिळतो स्वयंपाकाच्या गॅसच्या किंमती कमी करून तो सर्व कष्टक-यांना रुपये ३००/- प्रति सिलेंडर या प्रमाणे देण्यांत यावा. कष्टकरी घरकामगारांना हक्काचे दोन खोल्यांचे घर यासह विविध मागण्यांचा समावेश आहे.
आज रोजी आलेल्या मोर्चातील वन्याचशा ग्रामीण भागातील महिलांना रेशनकार्ड असून देखील त्यांना आर.सी.नंबर न मिळाल्यामुळे त्यांना रेशन कार्ड असून देखील धान्यांपासून या कष्टकरी महिला वंचीत आहे. तरी आपण जिल्हाधिकारी म्हणून संबंधीत तालुकाच्या तहसीलदारांना सुचना करून कष्टकरी घरकामगारांना धान्य मिळवून यावे अशी महासंघ मागणी करीत आहे. या मोर्चात सरचिटणीसउदय भट, अलीमुन्नीसा सैय्यद जहूर, वैशाली आळवणी, संघटक विकास आळवणी, कविता सपकाळे यांच्यासह मोठ्या प्रमाणावर महिलावर्ग उपस्थित होता.