बांभोरी येथून अज्ञात चोरट्यांनी रोकड व गावरान कोंबड्या चोरल्या

0

जळगाव;- धरणगाव तालुक्यातील बांभोरी येथील अज्ञात चोरट्यांनी एक लाख 65 हजार रुपये आणि सात हजार रुपये किमतीच्या तीन गावरान कोंबड्या चोरून नेल्याचा प्रकार 13 रोजी रात्री दहा ते 14 रोजी च्या सकाळी पाच वाजता दरम्यान घडला.

याप्रकरणी धरणगाव पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की अनिल विश्वास माळी वय 49 हे शेती व्यवसाय व भाजीपाला विक्री करून आपला उदरनिर्वाह करतात.

त्यांच्या बांभोरी येथील राहत्या घराच्या मागील दरवाज्याची कडी कोयंडा तोडून लोखंडी पेटी मधून दीड लाख रुपये रोख व धीरज बाबुराव पाटील यांच्या घराच्या मागील खिडकीच्या लोखंडी असणाऱ्या तोडून घरात प्रवेश करून घरातील रॅकवर ठेवलेल्या डब्यामधून रोकड 15 हजार रुपये व सुरेश रोहिदास पाटील यांच्या मालकीच्या बांबोरी बुद्रुक शेत शिवारामधून शेड मधील 7,000 रुपये किमतीच्या गावरान जातीच्या सात कोंबड्या व तीन कोंबडे असा एकूण एक लाख 72 हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लांबविण्याचा प्रकार 13 रोजी रात्री 10 ते 14 रोजी च्या सकाळी पाच वाजे दरम्यान घडला. याबाबत अनिल विश्वास माळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धरणगाव पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.