जळगाव येथील कांचन नगर येथे घरफोडी हजारोंचा ऐवज लंपास

0

जळगाव;- शहरातील कांचन नगर भागातील नयन किराणा जवळून एका घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे मनी मंगळसूत्र असा एकूण 63 हजार रुपयांचा मध्यमान चोरून येण्याची घटना 13 ते 14 रोजी दरम्यान घडली. याप्रकरणी शनिपेठ पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की एकनाथ भगवान सपकाळे वय 58 हे मजुरी करीत असून ते शहरातील कांचन नगर भागातील रविशंकर नगर मध्ये सद्गुरु बैठक हॉल जवळ राहतात. ते बाहेरगावी गेले असता आज्ञा चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून घरातील तीस हजार रुपये किमतीचे चार सुटे मणी मंगळसूत्रांची वाट यांची जोड व कानातील डोंगल तसेच ३०- हजार रुपये किमतीचे मनी मंगळसूत्र तीन हजार रुपयांचे ८ मनी असा एकूण 63 हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लांबविण्याचा प्रकार 13 ऑक्टोबर रोजी रात्री 10 ते 14 ऑक्टोबर रोजी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास घडला. याप्रकरणी एकनाथ सपकाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शनिपेठ पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.