हॉटेल ताज मध्ये बॉम्ब !…. आरोपीस अटक

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

मुंबईत धमक्यांचे फोन यायचे सत्र सुरूच आहे. मुंबईतील प्रसिद्ध असलेल्या हॉटेल ताजमध्ये बॉम्ब ठेवल्याचा फोन करणाऱ्या कॉलरला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीने हे कृत्य का केले? याचा तपास पोलीस करत आहे.

मुंबईत घातपाताची धमकी देण्याचे सत्र सातत्याने सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 14 ऑक्टोबर रोजी रात्री 8.30 च्या सुमारास एका व्यक्तीने मुंबई फायर ब्रिगेड कंट्रोलला फोन करून ताजमध्ये बॉम्ब असल्याचे सांगितले. ताज हॉटेलमध्ये बॉम्ब स्फोट होणार असून, तुम्हला पाहिजे ते करा. असे देखील तो या वेळी म्हणााला. यानंतर अग्नीशमन दलाने मुंबई पोलिसांना याबद्दल माहिती दिली. तात्काळ पोलीस, बॉम्ब शोधक आणि नाशक पथक ताज हॉटेल परिसरात दाखल झाले. पोलिसांनी लागलीच ताज हॉटेलची तपासणी केली असता, तासाभरानंतरही काहीही निष्पन्न झाले नाही. त्यानंतर बीकेसी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करून तपास सुरू केला. या प्रकरणी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली असून तरूणावर गुन्हा दाखल केला आहे.

धरमपाल सिंह (36 वर्षे) असे तरूणाते नाव असून, तो नवी दिल्ली येथील लक्ष्मीनगर भागातील रहिवासी आहे. पोलिसांनी आरोपीचा नंबर तपासला. तर त्याने फायर ब्रिगेड कंट्रोलला कॉल करण्यापूर्वी 28 वेळा मुंबई पोलिस कंट्रोलला कॉल केल्याचे आढळून आले. मुंबईच्या कुलाबा पोलिसांनी कॉलरवर आयपीसीच्या कलम 506(2) अन्वये गुन्हा दाखल केला आणि कॉलरला दिल्लीतून अटक केली असून, या संदर्भात पोलीस अधिक तपास करत असून फोन करणाऱ्याने व्यक्तीने असा फोन का केला याचा शोध घेत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.