बालगंधर्व नाट्यगृहाला आयुक्त विद्या गायकवाड देणार नवसंजीवनी…!

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

काल रविवारी ज्येष्ठ कलावंत विजय पाटकर हे एका कार्यक्रमानिमित्त शहरात आले असता, त्यांनी बालगंधर्व खुले नाट्यगृहाला सदिच्छा भेट दिली होती. त्यावेळी त्यांच्यासोबत स्थानिक कलावंतांसह शहराचे आमदार राजूमामा भोळे, माजी महापौर विष्णू भंगाळे, शिवसेनेचे गजानन मालपुरे हे नेतेही उपस्थित होते. यावेळी म.न.पा आयुक्त विद्या गायकवाड यांच्याशी फोनवर चर्चा झाल्यानंतर त्यांनी सोमवारी सकाळी ११ वाजता महानगर पालिकेत त्यांच्या कार्यालयात येऊन चर्चेसाठी बोलावले होते. त्या अनुषंगाने झालेल्या आजच्या बैठकीत कलावंतांनी नाट्यगृहाच्या झालेल्या दुराव्स्थेच्या बाबत आणि त्यावर उपयोजना करण्याबाबत लेखी निवेदन दिले.

निवेदन स्वीकारल्यानंतर म.न.पा आयुक्त विद्या गायकवाड यांनी बालगंधर्व नाट्यगृहाच्या दुरुस्ती संबंधीच्या पाहणीसाठी प्रमुख अभियंता सोनगिरे यांना उद्या काही कलावंतांसह बालगंधर्व येथे जाऊन निरीक्षण सर्वे करण्याचे सांगितले असून, लवकरात लवकर बालगंधर्वाचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे.

यावेळी शहराचे आमदार सुरेश दामू भोळे(राजू मामा), माजी महापौर विष्णू भंगाळे, गजानन मालपुरे, विशाल त्रिपाठी, रुपाली वाघ, रंगकर्मी रमेश भोळे, राजेंद्र देशमुख, गौरव लवंगले, सुदर्शन पाटील, पियुष रावळ, आकाश बाविस्कर आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.