धरणगाव कृ.उ.बा महाविकासआघाडी एकत्रित लढणार – गुलाबराव देवकर

0

 

धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

राज्यात सध्या बाजार समित्यांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. सगळीकडे बाजारसमितीच्या निवडणुकीचं वातावरण आहे. त्यात धरणगाव बाजार समितीच्या निवडणुकीत कोण कोणत्या पक्षाबरोबर राहणार याबबात चर्चा सुरू असतांना, आता एक नवीन चित्र पाहायला मिळाले आहे. नुकतीच महाविकास आघाडीची इच्छुक उमेदवारांची चाचपणी झाली. यात महाविकास आघाडी शेतकरी विकास पॅनल म्हणून निवडणूकित मैदानात उतरणार आहे.

यावेळी एकूण 50 इच्छुकांनी आपली मुलाखत दिली. यावेळी महाविकास आघाडी नेते माजी मंत्री गुलाबराव देवकर, शिवसेना सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, सुरेश चौधरी,  मा.नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, मा.लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी, काँग्रेसचे व्ही.डी पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख जयदीप पाटील, राष्ट्रवादी तालुकाप्रमुख धनराज माळी, शिवसेना उपजिल्हाप्रमुख ऍड.शरद माळी, राजेंद्र ठाकरे, शिवसेना शहर प्रमुख भागवत चौधरी, मा. नगरसेवक किरण मराठे, जितेंद्र धनगर आदींसह शेतकरी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.