यावल कृ.उ.बा समिती निवडणुकीतून मातब्बरांचेच अर्ज अवैध…

0

 

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत तीन मातब्बर उमेदवारांचे उमेदवारी अर्ज अवैध झाल्याचे जाहीर करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

संपुर्ण तालुक्यातील सहकार क्षेत्राचे लक्ष वेधणार्‍या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ३० एप्रिल रोजी होणार्‍या १८ संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी दाखल असलेल्या १४४ उमेदवारी अर्जांची  बुधवारी छाननी झाली. छाननी दरम्यान तीन उमेदवारी अर्ज अवैध झाले आहेत. अट्रावल येथील कृ.उ.बा समितीचे माजी सभापती नितिन चौधरी, किनगाव येथील यावल पं.स माजी उपसभापती उमाकांत पाटील आणि न्हावीचे तालुका खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन तथा विद्यमान संचालक सुनिल फिरके या तिघांचे अर्ज अवैध झाले आहेत. कृषी उत्पन्न बाजार समिती च्या निवडणुकीतुन या कॉंग्रेसच्या तीनही मातब्बर उमेदवारांचे उमेदवारी अर्ज अवैध ठरल्याने राजकीय वर्तृळात एकच चर्चेचा विषय बनला आहे .

आता यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतील उमेदवारी अर्जांची संख्या १४१ इतकी आहे. दिनांक २० एप्रील रोजी हा उमेदवारी अर्ज माघारीचा दिवस असुन दिनांक २१ एप्रील रोजी उमेदवारांना चिन्ह वाटप आणि उमेदवारांची अंतीम यादीचे प्रकाशन करण्यात येणार आहे. दिनांक ३० एप्रिल रविवार रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकी संदर्भातील माहिती यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठीचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा विशेष लेखापाल पी.एम. चव्हाण यांनी पत्रकारांना दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.