सामनेर ग्रामपंचायत उपसरपंचपदी रवींद्र पाटील बिनविरोध…

0

 

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

सामनेर ता. पाचोरा येथील ग्रामपंचायत उपसरपंचपदी रवींद्र तापीराम पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. माजी उपसरपंच बाळकृष्ण जगन्नाथ पाटील यांनी ठरल्याप्रमाणे उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर ६ एप्रिल रोजी रवींद्र पाटील यांचा उपसरपंचासाठी एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सरपंच संगीता भिल्ल यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच निवड करण्यात आली.

यावेळी बाळकृष्ण पाटील, महेंद्र साळुंखे, कोकिळा पाटील, मालती चव्हाण, पुनम साळुंखे हे ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. तर निवडणुकीचे कामकाज ग्रामविकास अधिकारी टी.पी. मराठे यांनी पाहिले. त्यांच्या निवडीबद्दल पाचोरा-भडगाव मतदार संघाचे माजी आमदार दिलीप वाघ, पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन संजय वाघ, नितीन तावडे, विकास पाटील, ललित वाघ यांनी अभिनंदन केले. यावेळी प्रा.राजेंद्र साळुंखे, प्रशांत साळुंखे, भालचंद्र चव्हाण, भोलेनाथ भिल्ल, शिवाजी चव्हाण, मकरंद पाटील, प्रशांत सूर्यवंशी, नितीन पाटील आदी उपस्थित होते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.