औरंगाबादेत अवैध गर्भपाताचा प्रकार उघडकीस आला

0

औरंगाबाद, लोकशाही न्यूज नेटवर्क

मुंडे गर्भपात केंद्रानंतर औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यात पुन्हा एकदा त्याच गुन्ह्याची पुनरावृत्ती झाल्याची घटना समोर आली आहे. चित्तेगाव येथे स्त्री रुग्णालयात महिलांची अवैध्यरित्या गर्भपात सुरु असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. उपचारादरम्यात एक महिलेची प्रकृती अचानक खालावल्याने तिला दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यात आले. त्यावेळी हा सर्व प्रकार समोर आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार डॉ. अमोल जाधव व डॉ. सोनाली जाधव गेल्या तीन-चार वर्षांपासून चित्तेगाव येथील पांगरा रोडवर स्त्री रुग्णालयाच्या नावाने हॉस्पिटल चालवत होते. दरम्यान याच रुग्णालयात ते गर्भपात देखील करत असत. गेल्या तीन वर्षांपासून हा प्रकार सुरु होता. मात्र याची कोणालाही खबर लागु नये याची पूर्ण खबरदारी घेतली हे देखील तेवढाच आश्चर्य म्हणावे लागेल.

कसे फुटले बिंग

अमोल व त्यांच्या पत्नीने एका महिलेचा २ जानेवारी रोजी गर्भपात केला, मात्र यावेळी शस्त्रक्रिया करतांना महिलेची प्रकृती बिघडली आणि तिला मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुरु झाला. त्यामुळे डॉ. अमोल जाधव याने महिलेला औरंगाबाद शहरातील एका खाजगी रुग्णालयात नेले. पण प्रकृती अजून गंभीर झाल्याने खाजगी रुग्णालयाने उपचार करण्यास नकार दिला. त्यादरम्यान त्या महिलेला एक शासकीय रुग्णालयात दाखल करून डॉ. अमोल जाधव फरार झाला. घडलेला सर्व प्रकार रुग्णालयालाने पोलिसांना कळविला.

रुग्णालयावर छापा
सदर महिला बुलढाणा जिल्यातील असून घाटी रुग्णालयात तिला भरती करण्यात आले. त्यावेळी तिचा गर्भ बाहेर आल्याचे आणि गर्भपिशवी फाटल्याने डॉक्टरांच्या लक्षात आले. त्यामुळे डॉक्टरांनी तातडीने शस्रक्रिया करून महिलेचा जीव वाचवला. आरोग्य विभागाने रात्री उशिरापर्यंत चितेगाव येथील औरंगाबाद स्त्री रुग्णायालावर छापा टाकून, त्याठिकाणी असलेले औषध आणि गर्भपाताचे साहित्य ताब्यात घेतले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.