जळगावच्या एकाची ९७ हजारांत ऑनलाईन फसवणूक

0

जळगाव I लोकशाही न्यूज नेटवर्क
केवायसी करून घ्या अन्यथा मोबाईल सेवा बंद होणार असल्याच्या बहाण्याने एकाला ९७ हजारांचा ऑनलाईन गंडा घालण्याची घटना जळगावात उघडकीस आली असून याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुनिल पाटील (वय-५७) मुक्ताई नगर जि. जळगाव यांना ४ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता घरी असतांना त्यांना अनोळखी नंबरवरून फोन आला. सांगितले की, आपला मोबाईल सेवा बंद होणार आहे असे सांगून तुम्हाला केवायसी करावी लागणार आहे.त्यानंतर भामट्याने सुनिल पाटील यांना ऑनलाईन फार्म भरण्याचे सांगितले. त्यांनी ऑनलाईन माहिती भरल्यानंतर त्यांच्या बँक खात्यातून ९७ हजार ४९६ रूपये ऑनलाईन वर्ग झाले. फसवणूक झाल्याचा प्रकार आल्यानंतर सुनिल पाटील दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात मोबाईलधारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोहेकॉ सलीम तडवी पुढील तपास करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.