जळगाव पुन्हा गारठले….

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

गेल्या २० दिवसापासून तापमानात घट बघायला मिळत होती, पण पुन्हा एकदा किमान तापमान ७.७. अंश सेल्सिअसच्या नीचांकावर गेल्याचे पाहायला मिळत आहे. शनिवारी राज्यात सर्वात नीचांकी तापमान जळगावव शहरात नोंदवले आहे. तर राज्यात दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक कमाल तापमान ३२.४ अंश सेल्सिअसही जळगाव शहरात शहरात नोंदवले गेले. त्यामुळे जगावकरांनी शनिवारी रात्री सर्वाधिक थंड वातावरण तर दिवसा सर्वाधिक गरम वातावरण अनुभवले आहे. त्यामुळे दुहेरी परिस्थिती निर्माण झाल्याचे दृश्य शहरात पाहायला मिळाले होते.

मकर संक्रांति नंतर वीस दिवसांनी शनिवारी किमान तापमान ७.७ अंशांच्या नीचांकीवर आले एकाच दिवसात चार अंशांनी घसरण झाली. दुपारी ३२.४ अंश तापमान नोंदवले गेले.

महाबळेश्वर पेक्षाही थंड

चार फेब्रुवारी रोजी राज्यातील थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वर येथे रात्रीच्या वेळी किमान तापमान १४.२ अंश सेल्सिअस तर जळगाव व त्यापेक्षाही निम्मे म्हणजे ७.७ सेल्सिअस तापमान होते.

Leave A Reply

Your email address will not be published.