जळगावात विवाहितेचा विनयभंग ; गुन्हा दाखल

0

जळगाव I लोकशाही न्यूज नेटवर्क
एका विवाहितेला धमकावून माझ्याशी लग्न कर असे म्हणून गळ घालणाऱ्या तरुणाने विवाहितेच्या पतीसह  वडिलांना शिवीगाळ करून धमकी दिल्याचा प्रकार घडला असून याबाबत तरुणाविरुद्ध महिलेच्या फिर्यादीवरून विनयभंगाच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव तालुक्यातील राहणारी विवाहिता १८ नोव्हेंबर २०२२ रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घरासमोर उभी असतांना कानळदा येथील किरण हिरामण पाटील हा तरुण आला. त्याने विवाहितेला तु माझ्याशी लग्न कर, असे म्हणत विवाहितेचा डावा हात धरुन तिचा विनयभंग केला, यादरम्यान किरण यास बोलले असता, त्याने विवाहितेचे वडील, तसेच चुलत भाऊ यांना शिवीगाळ केली, तसेच किरण याने विवाहित तरुणीचे पती यांना फोनवरुन दमदाटी केली. या घटनेप्रकरणी तब्बल तीन महिन्यानंतर विवाहित तरुणीने शुक्रवार, ३ फेब्रुवारी रोजी तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून यावरुन किरण हिरामण पाटीलरा. कानळदा ता. जळगाव याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हेडकॉन्स्टेबल बापू पाटील पुढील तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.