लाकडी पाट्या जाळल्याचा संशय ; युवकाला बेदम मारहाण

0

जळगाव लोकशाही न्यूज नेटवर्क
लाकडी पाट्या जाळल्याचा संशय आल्याने एका युवकाला बेदम मारहाण केल्याची घटना जळगाव शहरातील तानाजी मालुसरे नगरात ३ रोजी घडली असून याप्रकरणी शनीपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सूत्रांची दिलेली माहिती अशी कि, तानाजी मालुसरे नगरात गणेश डोळे वय २१ हा युवक कापड दुकानात कामाला असल्याने १९ जानेवारी रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास गणेश हा त्याच्या घरासमोरउभा असतांना यावेळी दिनकर नगरातील शिवदास सोनवणे याने लाकडी पाट्या जाळल्याचा संशय व्यक्त करत गणेश यास शिवीगाळ केली . तसेच शिवदास याने दुचाकीच्या चॅबीने गणेशच्या हातावर, पाठीवर, मारुन दुखापत करून डोक्यावर बुक्क्याने मारहाण केली. याचदरम्यान शिवदास याने गणेश याचा मोबाईल फोडून नुकसान देखील केले. याप्रकरणी तब्बल १५ दिवसानंतर शुक्रवारी गणेश डोळे याने शनिपेठ पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यानुसार शिवदास बापू सोनवणे याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस हेडकॉन्स्टेबल परीस जाधव पुढील तपासकरीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.