विवाहितेचा ५० हजारांच्या मागणीसाठी छळ

0

जामनेर ,लोकशाही न्यूज नेटवर्क
विवाहितेला ५० हजारांची मागणी करत मारहाण करून जीवेठार मारण्याची धमकी देवून छळ केल्याचा प्रकार भुसावळ तालुक्यातील कन्हाळा येथे समोर आला असून याप्रकरणी शनिवारी ५ फेब्रुवारी रोजी जामनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जामनेर तालुक्यातील डोहरी येथील माहेर असलेल्या विवाहिता विशाखा योगेश सोनवणे (वय-२५) यांचा विवाह भुसावळ तालुक्यातील कन्हाळा येथील योगेश गणेश सोनवणे यांच्याशी झाला असून लग्नानंतर काही दिवसांनी विवाहितेला लहान सहान गोष्टींवरून शिवीगाळ व मारहाण करण्यात येत होती. तसेचमोटारसायकल घेण्यासाठी माहेरहून ५० हजार रूपये आणावे अशी मागणी केली. पैसे आणले नाही म्हणून विवाहितेला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. सासू आणि सासरे हे सुद्धा यात सहभागी होत त्यांनी पैशांसाठी तगादा लावला. हा छळ सहन न झाल्याने विवाहिता माहेरी निघून आल्या. याबाबत विवाहितेने जामनेर पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून शनिवारी ४ फेब्रुवारी रोजी पती योगेश गणेश सोनवणे, सासरे गणेश धोंडू सोनवणे आणि सासू अलका गणेश सोनवणे तिघे रा. कन्हाळा ता. भुसावळ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोहेकॉ विनोद पाटील पुढील तपास करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.