धक्कादायक; ७ महिन्यांच्या गरोदर स. प्रध्यापिकेची आत्महत्या…

0

 

औरंगाबाद, लोकशाही न्यूज नेटवर्क:

औरंगाबाद शहरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. औरंगाबाद येथील एका इंजिनिअरींग महाविद्यालयातील गरोदर असलेल्या सहाय्यक प्राध्यापिकेने आपली जीवनयात्रा संपवली आहे.

वर्षा दीपक नागलोत (३०) असं मृत महिला प्राध्यपिकेचं नाव आहे. वर्षा या औरंगाबाद (Aurangabad) शहरातील गारखेडा परिसरात आपल्या पतीसह राहत होत्या. शुक्रवारी महाविद्यालयातून ड्युटीवरून घरी परतल्यानंतर त्यांनी आपल्या बेडरुममध्ये गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली.

या घटनेची माहिती मिळताच वर्षा यांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेत त्यांना उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केलं. परंतू तोपर्यंत त्यांचा मृत्यू झालेला होता. वर्षा या सात महिन्यांच्या गरोदर होत्या. दहा वर्षांपूर्वी त्यांनी प्रेमविवाह केला होता. तेव्हापासून त्यांना सासरच्यांकडून शारीरिक आणि मानसिक त्रास दिला जात होता, असा आरोप मयत वर्षा यांच्या नातेवाईकांनी केला आहे. दरम्यान, या घटनेनंतर शहरातील पुंडलिकनगर पोलिसांनी (Police) मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.