चोपड्यात दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार ; संशयित ताब्यात

0

चोपडा , लोकशाही न्यूज नेटवर्क

दोन अल्पवयीन विद्यार्थिनींवर अत्याचार केल्याप्रकरणी चोपडा शहर पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले असून यातील संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या घटनेत अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याचे समोर आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना तालुक्यातील एका गावात घडली. याप्रकरणी संशयित विलास सुभाष भिल (वय २०) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. संशयिताने तिच्या लहान भावाला मारून टाकण्याची धमकी देत, पीडीतेवर अत्याचार केला. मे, जून व डिसेंबर २०२२ जानेवारी व फेब्रुवारीत त्याने शेतात, कॉलेजमध्ये अशा वेगवेगळ्या ठिकाणी मुलीवर अत्याचार केला.

 

तसेच पिडीतेसोबत असलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. . या प्रकरणी पीडीतेच्या फिर्यादीवरून संशयितावर चोपडा शहर पोलिस स्टेशनला कलम ३७६, (१), सह बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक गुन्हा अधिनियम २०१२ च्या कलम ४, ८ प्रमाणे गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे. दुस-या गुन्ह्यातील संशयीत आरोपीने पिडितेसोबत काढलेले फोटो समाजमाध्यमात प्रसारीत करण्याची तिला धमकी दिली आहे. चोपडा शहर पोलिस स्टेशनला दाखल दोन्ही गुन्ह्यातील संशयीत आरोपी अटक असून या दोन्ही गुन्ह्यांचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक अजित सावळे करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.