अल्पवयीन मुलीने अत्याचारातून दिला बाळाला जन्म

0

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क

एका अल्पवयीन तरुणीला लग्नाचे आमिष दाखवत वारवांर अत्याचार करण्यात आल्याने त्यातून पीडीता गर्भवती राहिल्याने तिने नुकताच बाळाला जन्म दिला आहे. या प्रकरणी पोस्कोसह विविध कलमान्वये संशयित तरुणासह चौघांविरोधात जळगाव शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.

साडेसतरा वर्षीय पिडीतेच्या तक्रारीनुसार सप्टेंबर 2019 ते जानेवारी 2023 या कालावधीत लग्नाचे आमिष दाखवत संशयित आरोपीने पिडीतेसोबत वेळोवेळी शरीरसंबंध प्रस्थापीत केले. त्यातून तिला गर्भधारणा झाली आणि तिने एका बाळाला जन्म दिला आहे. त्यानंतर आरोपीने तिच्यासोबत लग्न करण्यास नकार दिला. मुख्य संशयीत आरोपीच्या सांगण्यावरुन इतर तिघांनी तिला मारहाण व शिवीगाळ केली.या पोलिस उप निरीक्षक सर्जेराव क्षिरसागर गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.