नोकरदाराचा नग्न व्हिडीओ करून ५ लाखात गंडवले

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

सेक्सटॉर्शनला आजकाल बरेच जण बळी पडत आहे. अशीच एक घटना जळगाव शहरात घडली आहे. नोकरदाराच्या अश्लिल व्हिडीओ बनवून तो व्हायरल करण्याची धमकी देत पैशांची मागणी करुन ते पैसे ऑनलाईन स्विकारल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील गिरणा पंपीग भागातील रहिवासी असलेल्या एका नोकरदाराला त्याच्या व्हाटसअ‍ॅप क्रमांकावर अनोळखी क्रमांकावरुन अश्लील व्हिडीओ कॉल आला. दरम्यान इकडून बोलणा-याचा नग्न व्हिडीओ व्हायरल झाला असल्याचे नंतर त्याला सांगण्यात आले. हा व्हिडीओ डिलीट करण्यासाठी पैशांची मागणी करण्यात आली. तसेच व्हिडीओ डिलीट न केल्यास पलीकडून आयपीएस बोलत असल्याचे सांगून कायदेशीर कारवाईची धमकी देण्यात आली. अशा धमक्या देवून नोकरदाराला प्रचंड घाबरवले.

दरम्यान घाबरलेल्या या नोकरदाराने 5 लाख 81 हजार 80 रुपये धमकवणाऱ्यांच्या विविध बॅंकाच्या खात्यावर ऑनलाईन वर्ग केले. त्यानंतर देखील त्यांनी या नोकरदाराला पैशांची मागणी केली. रुपा, आयपीएस प्रेमप्रकाश आणी मनजितसिंग त्यांची नावे आहेत. व्हाटसअ‍ॅप मेसेज आणि बनावट नावे सांगून पैशांची मागणीसह धमकी देणा-या या तिघांविरुद्ध सायबर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी गुन्ह्याचा पुढील तपास पो.नि. लिलाधर कानडे करत आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.