कर्णधार रोहित शर्मा ठरला तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक झळकावणारा पहिला भारतीय

0

नागपूर,लोकशाही न्यूज नेटवर्क

भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा (Border-Gavaskar Trophy) पहिला सामना नागपुरातील (Nagpur) जामठा स्टेडियमवर खेळवला जात आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू असून दुसरे सत्र सुरू आहे.ऑस्ट्रेलियन संघाने पहिल्या डावात केलेल्या 177 धावांना प्रत्युत्तर देताना टीम इंडियाने 5 विकेट गमावत 171 धावा केल्या आहेत. कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) क्रीजवर आहेत.भारतीय कर्णधार रोहित शर्माने आपल्या कसोटी कारकिर्दीतील 15 वे अर्धशतक झळकावले आहे. तो त्याच्या 9व्या शतकाकडे वाटचाल करत आहे.

सूर्यकुमार यादव 8 धावा करून बाद झाला. त्याला नॅथन लायनने बोल्ड केले. तत्पूर्वी, विराट कोहली 12 धावांवर, चेतेश्वर पुजारा 7 धावांवर, रविचंद्रन अश्विन 23 धावांवर आणि केएल राहुल 20 धावांवर बाद झाला.डेब्यू मॅच खेळणाऱ्या टॉड मर्फीने चार विकेट घेतल्या आहेत. तर नॅथन लायनला एक विकेट मिळाली.

अशा पडल्या टीम इंडियाच्या विकेट

पहिली : केएल राहुलला टॉड मर्फीने त्याच्याच चेंडूवर झेलबाद केले.
दुसरी : टॉड मर्फीने 41व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर अश्विनला LBW केले.
तिसरी : टॉड मर्फीने पुजाराला स्कॉट बोलंडकरवी झेलबाद केले.
चौथी : मर्फीने विराट कोहलीला अॅलेक्स कॅरीकरवी झेलबाद केले.

Leave A Reply

Your email address will not be published.