जळगावात सुसाट वाहन चालवताय ? मग बातमी वाचाच

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव शहराचा विस्थार हा झपाट्याने होत जात आहे. त्यामुळे वाहनांची संख्या सुद्धा दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आणि सोबतच वाहनाच्या वेगाला आला घालणेही तेवढेच महत्वाचे आहे. त्यामुळे शहरात अपघातांचे प्रमाणात घट होऊ शकते. २० ते २५ टक्के‎ वाहने एकट्या जळगाव शहरात‎ धावत असल्याचा अंदाज आहे.‎ गेल्या काही वर्षांत जुनाट सिग्नल‎ यंत्रणा बंदावस्थेत असल्याने‎ वाहनांच्या वेगावर नियंत्रण राहिलेले‎ नाही. त्यामुळे माेठ्या प्रमाणात‎ अपघाताचे प्रमाणही वाढले आहे;‎ परंतु सुसाट धावणाऱ्या‎ वाहनधारकांना ब्रेक लावण्यासाठी‎ महापालिका शहरातील प्रमुख‎ चाैकांसह महामार्गावरील २५‎ चाैकांत सिग्नल यंत्रणा बसवणार‎ आहे. त्यात पायी चालणाऱ्यांसाठी‎ खास व्यवस्था केली जाणार आहे.‎ यासाठी सुमारे पावणेपाच काेटींचा‎ खर्च येईल.‎ शहराचा विस्तार झपाट्याने वाढू‎ लागला आहे. आजुबाजूच्या‎ गावांपर्यंत शहर वाढत चालले आहे.‎

स्वातंत्र्य चौकात बंद असलेला‎ सिग्नलही दुरुस्त हाेणार आहे.‎ या ठिकाणी ब्लिंकर बसवणार : डी-मार्ट चाैक, ख्वाॅजामिया‎ दर्गा चाैक, महामार्गावर लीलापार्क चाैक, सुप्रीम काॅलनी चाैक, प्रभात‎ काॅलनी चाैक, राष्ट्रीय महामार्ग जिल्हा उद्याेग केंद्र, आयएमआर चाैक,‎ राष्ट्रीय महामार्ग विद्युत काॅलनी चाैक, मानराज पार्क चाैक, गुजराल‎ पेट्राेलपंप चाैकात स्वयंचलित वाहतूक ब्लिंकर बसवण्यात येणार आहेत.‎

ख्वाजामियाॅ चाैक,‎ महेश चाैक, गुजराल चाैक आदी ठिकाणी सिग्नल असतानाही वाहतूक‎ काेंडीचा सामना करावा लागला आहे. बऱ्याच ठिकाणी पाेलिस कर्मचारी‎ नसल्याने ब्लिंकर माेडवर सिग्नल असल्याचे वर्षानुवर्षे पाहायला मिळाले‎ आहे. टाॅवर चाैकात प्रचंड वाहतूक असतानाही त्या ठिकाणी व्यवस्था नाही.‎ खर्चासाठी तीन पर्याय : शहरात नव्याने सिग्नल यंत्रणा उभारण्यासाठी ४‎ काेटी ७५ लाखांचा खर्च येणार आहे. हा खर्च मनपा फंडातून करणे‎ जिकिरीचे ठरणार आहे. त्यामुळे वाहतूक नियंत्रण शाखा व राष्ट्रीय महामार्ग‎ प्राधिकरण विभाग यांच्या अंतिम शिफारसीनुसार आवश्यक त्या ठिकाणी‎ स्वयंचलित वाहतूक नियंत्रक तसेच ब्लिंकर बसवले जाणार आहेत. सुप्रीम‎ इंडस्ट्रीजची अरुण वैद्य चाैक, नेल्सन मंडेला चाैकात सिग्नल लावण्याची‎ तयारी आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.