सावधान ! दहावी- बारावीच्या परीक्षेवर कॅमेऱ्याची नजर

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाने दहावी बारावी परीक्षेसंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. कॉपीचा गैरप्रकार रोखण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. आत परीक्षा केंद्रावरील केंद्रप्रमुख व पर्यवेक्षकांकडील मोबाइल ॲपवरील कॅमेऱ्यातून वर्गावर नजर ठेवली जाणार आहे.

माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षार्थींच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक परीक्षा मंडळाने जाहीर केले आहे. यामध्ये बारावीची लेखी परीक्षा २१ फेब्रुवारी तर इयत्ता दहावीची २ मार्चपासून सुरू होणार आहे. या परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

अनेक परीक्षा केंद्रांवर खुलेआम कॉपी केली जाते. इतकेच काय तर परीक्षार्थी व पर्यवेक्षक यांच्या संगनमताने देखील विविध केंद्रांवर मोठ्या प्रमाणात कॉपीसारखे गैरप्रकार घडल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. दरम्यान या सर्व गोष्टींचा परिणाम हुशार विद्यार्थ्यांवर होतो. हे सर्व गैरप्रकार रोखण्यासाठी यंदा परीक्षा मंडळाने परीक्षा केंद्रांवर पर्यवेक्षकांसह मोबाइल ॲप कॅमेऱ्यामधून लक्ष ठेवण्याची निर्णय घेतला आहे. म्हणून आता कॉपीबहाद्दरांचे परीक्षेआधीच धाबे दणाणले आहेत. या निर्णयाचे हुशार विद्यार्थ्यांनी स्वागत केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.