जिल्ह्यातील १८ आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या वारसांना एक लाखाची मदत- जिल्हाधिकारी

0

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क
जळगाव जिल्ह्यातील १८ आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून एक लाख रूपये देण्याला जिल्हास्तरीय शेतकरी आत्महत्या समितीने मंजूरी दिली आहे. शेतकरी आत्महत्या समितीच्या बैठकीत ९ प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली आहे अशी माहिती जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी बुधवारी १ मार्च रोजी प्रसिध्दीपत्रकान्वये दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जिल्हास्तरीय शेतकरी आत्महत्या समितीची बैठक नुकतीच जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत २७ प्रकरणांवर चर्चा करण्यात आली. त्यातील १८ आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांची प्रकरणे पात्र तर ९ प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली.

पात्र शेतकर्‍यांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून एक लाखाची मदत मंजूर करण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.