झुलेलाल सोशल ग्रुप आयोजित मॅरेथॉनमध्ये धावले हजारो स्पर्धक

0

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क

येथील झुलेलाल सिंधी सोशल ग्रुपतर्फे मेहरुण तलावाच्या ट्रॅकवर आयोजित मॅरेथॉन स्पर्धेत हजारापेक्षा स्पर्धकांनी सहभाग घेतला. समाजात ऐक्याची भावना वाढीव लागावी म्हणून स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. सेवा मंडल संचलित वृद्धाश्रमातील ज्येष्ठांनी ध्वज दाखवून प्रारंभ करण्यात आला.

यात ३, ५ आणि १० किलोमीटर स्पर्धेचे अंतर होते. सहभागी स्पर्धकांना टी-शर्ट, मेडल देण्यात आले. स्पर्धकांसाठी पाण्याची सुविधा, वैद्यकीय पथक सेल्फी पाँईटची व्यवस्था करण्यातआली होती. यशस्वीतेसाठी विजय शामनानी, हरीश रायसिंघानी, प्रेम कटारिया, सुनील सुखवानी, अनूप तेजवानी, अमित गगवानी, अनिता नाथानी, रितू रायसिंघानी, जान्हवी परसवाणी, रचना गांधी यांनी परिश्रम घेतले.

विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. स्पर्धेचे प्रथमच आयोजन करण्यात आले होते. त्यास समाजातील अबालवृद्धांसह युवक-युवतींचा मोठा प्रतिसाद लाभला, असे आयोजकांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.