रोटरी जळगाव सेंट्रलतर्फे प्रेरणादायी पुस्तकांचे वितरण

0

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क

येथील रोटरी क्लब ऑफ जळगाव सेंट्रलतर्फे जळका तांडा व बेळी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी पुस्तकांचे वितरण करण्यात आले. यावेळी अध्यक्ष विपुल पारेख, कल्पेशा शाह, मानद सचिव रविंद्र वाणी, सहसचिव दिनेश थोरात, माजी अध्यक्ष प्रा.डॉ. अपर्णा भट-कासार यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. विद्या चौधरी यांनी विद्यार्थ्यांना आदर्श व्यक्तींच्या पुस्तक वाचनातून आपल्याला प्रेरणा मिळेल, असे मार्गदर्शन करताना सांगितले. तर साधना दामले यांनी संवाद साधताना व्यक्तिमत्व विकासासाठी वाचन महत्वाचे असून महान व्यक्तींचा जीवनपट, संघर्ष आपल्याला दिशा देतात, असे सांगितले.
अध्यक्ष विपूल पारेख यांनी पुस्तकातून ज्ञान मिळवून जीवनात यशस्वी व्हा, असे मनोगतात विद्यार्थ्यांना आवाहन केले. यशस्वीतेसाठी जळका तांडा व बेळी येथील शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.