Nagaland Assembly Elections Result : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ने मारली बाजी

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

रामदास आठवले (Ramdas Aathawale) आणि त्यांच्या कविता लोकप्रिय तर आहेच, सोबतच आता रामदास आठवलेंनी नागालँड मध्ये आपल्या पार्टीचा झेंडा फडकावला आहे. महाराष्ट्रात कसबा पेठ आणि चिंचवडच्या पोटनिवडणूकांची चर्चा सुरू असताना इशान्येकडील राज्यामधील निवडणूकांचा निकाल हाती येणे सुरू झाले आहे. या निवडणूकीत पहिल्यांदाच रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) ने बाजी मारली आहे.

आठवले यांच्या आरपीआय पक्षाचे दोन उमेदवार नागालँडमध्ये विजयी झाले आहे. विधानसभा निवडणूकीत पहिल्यांदाच पक्षाच्या दोन महिला उमेदवारांनी महाराष्ट्राच्या बाहेर विजयाचा गुलाल उधळला आहे. मतमोजणीत नागालँडमध्ये भाजप-एनडीपीपी सध्या आघाडीवर असून यादरम्यान महाराष्ट्राच्या बाहेर देखील रामदास आठवले यांच्या आरपीआय पक्षाचे दोन उमेदवार विजयी झाले आहेत. ही आठवले यांच्यासाठी ही मोठी गोष्ट असल्याचे बोलले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.