औद्योगिक नाट्यस्पर्धा अंतिम फेरीत जळगावचे वेग्गळं अस काहितरी चतुर्थ

0

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क

नागपूर येथे संपन्न झालेल्या तेराव्या औद्योगिक नाट्यमहोत्सव अंतिम फेरीत जळगाव येथील कलादर्श स्मृतिचिन्हतर्फे सादर करण्यात आलेल्या वेग्गळं असं काहितरी या नाटकाला चतुर्थ क्रमांकाचे पारितोषिक व नाटकातील कलावंत पद्मनाभ देशपांडे यांना अभिनयाचे प्रमाणपत्र मिळाले आहे.

नागपूर येथील कामगार भवन, राजे रघुजीनगर येथे झालेल्या अंतिम फेरीतील नाट्यमहोत्सवात संपूर्ण राज्यभरातून २८ नाटकांचा समावेश होता. या नाट्यमहोत्सवात जळगाव येथील कलादर्श स्मृतिचिन्हतर्फे सादर करण्यात आलेल्या हेमंत कुलकर्णी लिखीत वेग्गळं असं काहितरी या नाटकात पद्मनाभ देशपांडे, मंजुषा भिडे, दिप्ती बारी, योगेश शुक्ल, गणेश बारी, धनंजय धनगर, आशिष राजपूत यांचा सहभाग होता.

नाटकाचे नेपथ्य सचिन आढारे, प्रकाशयोजना जयेश कुलकर्णी, पार्श्वसंगीत अम्मार मोकाशी, सुहानी बारी, रंगभूषा श्रध्दा शुक्ल यांचा सहभाग होता. नाट्यमहोत्सवाच्या अंतिम फेरीसाठी प्रभाकर दुपारे, किशोर डाऊ, नरेंद्र आमले, सुधाकर गीते, रुपाली कोंडेवार मोरे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

Leave A Reply

Your email address will not be published.