मु.जे महाविद्यालयाच्या ‘चैतन्य’ स्नेहसंमेलनला उत्साहात सुरुवात

0

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क
दोन वर्षाच्या कोविड महामारीनंतर महाविद्यालय अगदी शांत होती महाविद्यालयांमध्ये कुठलेच सांस्कृतिक कार्यक्रम होत नव्हते. मात्र यंदा सर्व निर्बंध हटवले गेल्याने सर्वच महाविद्यालयांमध्ये स्नेहसंमेलनाचा जल्लोष बघावयास मिळतो आहे यातच शहरातील मु.जे महाविद्यालयामध्ये चैतन्य 2023 या स्नेहसंमेलनाला उत्साहात सुरुवात झाली असून गुरुवार दोन रोजी “बॉलीवूड डे”उत्साहात साजरा करण्यात आला

यात विद्यार्थिनींनी गंगुबाई काठीयावाडी, माता शिवगामी, अंजली, मंजुलिका, अनुराधा, श्री वल्ली, काशीबाई, मस्तानी, तर विद्यार्थ्यांनी रामचरण, सिंग इज किंग, बाबुभाई, रॉकी भाई, कुली नंबर वन, मुन्नाभाई एमबीबीएस, तुरुंगातील कैदी, पी.के, पुष्पा, अशा विविध अभिनेते व अभिनेत्रींच्या भूमिका हुबेहूब साकारल्या होत्या. त्यांना बघून जणू महाविद्यालयात बॉलिवूड जगत अवतरले असेच वाटत होते.

मुलांनी या डेनिमित्त विविध भूमिका साकारल्या मुलांमध्ये दक्षिणात्य चित्रपटातील अभिनेते व अभिनेत्रींच्या भूमिकांचा प्रभाव या डे निमित्त बघावयास मिळाला यानिमित्त मुलांनी बरीच धमाल केल्याचे चित्र महाविद्यालयात बघावयास मिळाले

 

Leave A Reply

Your email address will not be published.