त्यामुळेच आता माझ्याकडे महिला बॉडीगार्ड – शाहरुख खान

0

मुंबई , लोकशाही न्यूज नेटवर्क
शाहरुख खानने स्वत: सांगितलं होतं की, जेव्हा तो कुठेही जातो तेव्हा त्याच्या महिला चाहत्या त्याच्यासोबत फोटो काढण्यासाठी धक्काबुक्की करत असतात. पण जेव्हा बॉडीगार्ड्स त्या महिलांना मागे ढकलतात तेव्हा किंग खानला खूप वाईट वाटतं.

त्यामुळेच आता माझ्याकडे महिला बॉडीगार्ड आहेत. पूर्वी माझ्या सुरक्षेसाठी बॉडीगार्ड मुलींना मागे ढकलायचे तेव्हा मला ते आवडत नसे, आणि म्हणूनच मी माझ्या महिला चाहत्यांचा विचार करुन महिला बॉडीगार्ड तैनात केले आहेत. शाहरुख खानने ‘पठाण’च्या माध्यमातून तब्बल चार वर्षांनंतर पडद्यावर पुनरागमन केलं आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान यशस्वी ठरला आहे. शाहरुखच्या या चित्रटाने बॉक्स ऑफिसचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढत नव्हे रेकॉर्ड सेट केले आहेत. या चित्रपटाच्या माध्यमातून शाहरुख आणि दीपिका पादुकोणची खास केमिस्ट्री पुन्हा एकदा चाहत्यांना अनुभवायला मिळाली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.