लोकशाही न्यूज नेटवर्क
जगात अनेक प्रथा कु प्रथा प्रचलित असून शतकानुशतके अशा वाईट प्रथेचे पालन आजही करत आहेत. अशा प्रथांबद्दल अनेकांना आश्चर्य अथवा घृणा निर्माण होऊ शकते . जगात अशीच एक जमात असून ज्या जमातीमधील मुली आपल्या बापाशी लग्न करतात .पण बांगलादेश हा जगातील असाच एक देश आहे, जिथे मंडी जमातीत मुलींचे लग्न त्यांच्या वडिलांशी लावले जाते.
या जमातीतील लोक विचित्र परंपरा पाळतात. इथे जेव्हा एखादा पुरुष तरुण वयात विधवा झालेल्या स्त्रीशी लग्न करतो, तेव्हा हे निश्चित होतं की तो पुरुष भविष्यात त्या स्त्रीच्या मुलीशीच लग्न करणार आहे.
ज्यामध्ये या महिलांना पहिल्या नवऱ्यापासून जर मुलगी झाली असेल, तर या मुलीशी तिचे सावत्र बाप लग्न करतात आणि तिला आपली बायको बनवतात. मुलगी ज्याला लहानपणापासून आपला बाप मानते, ती मुलगी तरुण झाल्यावर त्याला आपला नवरा मानू लागते, ही गोष्ट फक्त विचार केला तरी घृणास्पद वाटेल परंतु हे सत्य आहे. तर हे लोक ही प्रथा प्रत्यक्षात जगतात. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की ही प्रथा आजच्या काळातील नाही, तर ही शतकानुशतके पाळली जात आहे. मात्र, या दुष्ट प्रथेमध्ये वडील सावत्र बाप असणे आवश्यक आहे.
वास्तविक किंवा खरे वडिल हे कधीही या प्रथेचा भाग बनत नाही. जेव्हा एखाद्या महिलेचा नवरा तरुण वयातच जातो आणि या महिलेला एक मुलगी असेल, तर अशाच महिलांशी शक्यतो हे पुरुष लग्न करतात आणि मग कालांतरणाने त्या महिलेच्या मुलीला देखील आपली बायको बनवतात. या दुष्ट प्रथेबद्दल, या जमातीतील लोकांचा असा विश्वास आहे की एक तरुण पती आपली पत्नी आणि मुलगी दोघांचेही दीर्घकाळ संरक्षण करू शकतो. पण या परंपरेमुळे मंडी जमातीतील अनेक मुलींचे जीवन नरक बनले आहे.
वडिलांसोबत मुलीच्या लग्नाबाबत, याच जमातीतील 30 वर्षीय ओरोला या महिलेचे म्हणणे आहे की, तिचे वडील लहान असतानाच वारले. त्यावेळी तिच्या आईने नोटेन नावाच्या दुसर्या व्यक्तीशी लग्न केले आणि त्यानंतर ती नेहमी तिच्या दुसर्या वडिलांकडे पाहत असे आणि ते किती चांगले आहेत याचे आश्चर्य वाटायचे. पण जेव्हा ती तारुण्यात येऊ लागली, तेव्हा तिला कळले की तिचे दुसरे वडील, नोटेन हे तिचे पती आहेत ओरोलाचे लग्न तिच्या वडिलांशी झाले होते जेव्हा ती फक्त 3 वर्षांची होती. आश्चर्याची बाब म्हणजे बांगलादेशातील मंडी जातीमध्ये ही प्रथा अजूनही प्रचलित आहे.