रेल्वे समोर स्वतःला झोकून देत शेतकऱ्याची आत्महत्या

0

जळगाव :- शेतीसाठी घेतलेल्या कर्जाचा डोक्यावर डोंगर वाढतच असल्याने शेतकरी गेल्या अनेक दिवसांपासून विवंचनेत होते. यातूनच कैलास भिवसन पाटील (वय ५०, रा. लमांजन, ता. जळगाव) यांनी कुऱ्हाडदे ते शिरसोली दरम्यान रेल्वे समोर स्वतःला झोकून देत आत्महत्या केली. ही घटना शनिवार दि. २ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद – करण्यात आली आहे.

तालुक्यातील लमांजन येथे कैलास भिवसन पाटील हे – आपल्या पत्नी, मुलगा आणि सुन – यांच्या सोबत वास्तव्याला होते. – शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करत होते. त्यांच्यावर खासगी आणि सोसायटीचे कर्ज असल्याने ते काही महिन्यांपासून ते कर्जबाजारीमुळे विवंचनेत होते. या कर्जबाजारीला कंटाळून त्यांनी शनिवार दि. २ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजेच्या दरम्यान कुहळदे ते शिरसोली दरम्यानच्या रेल्वे खंबा क्रमांक ४०१च्या १९ जवळ धावत्या रेल्वे समोर येवून आत्महत्या केली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

घटनेची माहिती लक्षात आल्यानंतर रेल्वेचे लोकोपायट यांनी शिरसोली रेल्वे स्टेशनचे मास्टर यांना कळविली. त्यानंतर लमांजनचे पोलीस पाटील भाऊराव पाटील यांनी घटनास्थळी आल्यानंतर त्यांनी मयताची ओळख पटविली. त्यानंतर खासगी वाहनातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृतदेह आणण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.