आजाराला कंटाळून इसमाने घेतला गळफास ; जळगावातील घटना

0

जळगाव : मधूमेहाच्या आजाराला कंटाळून सतिष बाबूराव ससाणे (वय ४२, रा. तांबापूरा) यांनी राहत्या घरामध्ये गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपवली. ही घटना मंगळवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास तांबापुरा येथे उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

शहरातील तांबापुरा परिसरात सतिश ससाणे हे कुटुंबियास वास्तव्यास असून ते हातमजुरी करून ते कुटूंबाचा उदरनिर्वाह करत होते. गेल्या अनेक दिवसांपासून ते मधूमेहाच्या आजारपणामुळे त्रस्त होते. मंगळवारी पत्नी कामावर तर मुले बाहेर गेलेले असल्याने सतिष ससाणे हे घरी एकटेच होते. सकाळी पुतण्याला त्यांनी नाश्ता घेण्यासाठी पाठविले. याच दरम्यानात त्यांनी राहत्या घरामध्ये गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी असा परिवार असून याप्रकरणी एमआयडीसीपोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.