विजेचा धक्का लागल्यानेतरुणाचा उपचारादरम्यान झाला मृत्यू

0

जळगाव : विट भट्टीवर काम करतांना विजेच्या जोरदार झटका लागल्याने तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना मुक्ताईनगर तालुक्यातील वढवे येथे घडली होती. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या रविंद्र संतोष चौधरी (वय-३८ रा. वाढवे ता. मुक्ताईनगर) या तरुणाची मंगळवारी सकाळच्या सुमारास प्राणज्योत मालवली. मुक्ताईनगर तालुक्यातील वढवे येथील रविद्र चौधरी हे विट भट्टीवर काम करुन उदरनिर्वाह करीत होते. नेहमीप्रमाणे दि. २९ डिसेंबर रोजी सकाळी रविंद्र चौधरी हे कामावर असतांना त्याला विटभट्टीजवळ असलेल्या तारांवर ईलेक्ट्रीक वायर टाकत असतांना जोरदार विजेचा धक्का लागल्याने गंभीर जखमी झाले. त्याला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असतांना मंगळवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास प्राणज्योत मालवली. मयत रविंद्र चौधरीच्या पश्चात आई, वडील, पत्नी, आणि मुलगा असा परिवार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.