घरफोडी प्रकरणातील तीन अट्टल गुन्हेगारांना अटक

0

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क
जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेर घरफोडी करणाऱ्या तीन अट्टल गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली असून त्यांना पुढील कारवाईसाठी पहूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

जामनेर तालुक्यातील पहूर पोलीस स्थानकात दि. ०९ रोजी ज्वेलरी दुकानाचे शटरच्या कुलूपास लावलेले पट्टया कापून दुकानातून ४५,०००/- रुपयाचा सोन्या-चांदीचे दागिने, बेनटेक्सचे दागिने चोरी केले होते. त्यानंतर सदर गुन्हयांतील अज्ञात आरोपीने लंपास केला होता. या प्रकरणी तपास जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडे आला असता.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी त्यांना मिळालेली गोपनिय माहिती मिळाली की, धरणगाव शहरात गजानन सोपान शिंगाळे रा. पाचन वडगाव ता. जि. जालना हा अट्टल गुन्हेगार आलेला आहे. तो वेगवेगळया जिल्हयांत घरफोडी, चोरी, जबरी चोरी, दरोडा या सारखे गुन्हे करतो. सदर बातमीची खात्री करण्यासाठी त्यांचे अधिनस्त पोउनि, अमोल देवढे, पोहेकॉ विजयसिंग धनसिंग पाटील, संदिर रमेश पाटील, अशरफ शेख निजामोद्दीन, सुधाकर रामदास अंभोरे, सुनिल पंडीत दामोदरे, पोना.प्रविण जनार्दन मांडोळे, रविंद्र रमेश पाटील, अविनाश बापुराव देवरे, पोको दिपककुमार फुलचंद शिंदे, चापोकों. प्रमोद शिवाजी ठाकुर सर्व नेम स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव अशांचे पथक तयार करुन सदर गुन्हयांतील संशयीत आरोपीतांचा शोध घेत असतांना तसेच धरणगाव पो.स्टे.चे पोलीस निरीक्षक, राहुल खताळ यांनी त्याचे पो.स्टे. पोलीस अंमलदार पोना. मिलींद अशोक सोनार, पोकों.वैभव गोकुळ बाविस्कर असेन्य वरील स्था.गु.शा. चे पथक अशांनी धरणगाव शहरात अज्ञात आरोपीतांचा शोध घेत असतांना आरोपी गजानन सोपान शिंगाडे वय ३२ रा.पाचन वडगाव ता. जि. जालना, करतारसिंग गुरुमुखसिंग जुनी वय १९ रा. सरकारी दवाखान मागे धरणगाव ता. धरणगाव, बलदेवसिंग बापुसिंग जुनी वय २२ रा. सरकारी दवाखाना मागे, धरणगाव ता.धरणगाव यांना धरणगाव शहरात पाठलाग करून शिताफीने ताब्यात घेवून त्यांना घरफोडी चोरी बाबत विचारपुस केली असता त्यांनी फत्तेपुर ता. जामनेर, वाकडी ता. जामनेर येथे ज्वेलरीचे व इतर दुकाने फोडून त्यातील रोख रुपये व दागिने चोरी केल्याचे सांगितले. व धरणगाव येथून एक पिकअप चारचाकी गाड़ी चोरी केल्याचे कबुल केले आहे. त्यावरुन खात्री केली असता १) पहूर पो.स्टे.ला विविध गुन्हे दाखल आहेत. १) गजानन सोपान शिंगाडे वय ३२ रा. पाचन वडगाव ता. जि. जालना, २) करतारसिंग गुरुमुखसिंग जुनी वय १९ रा. सरकारी दवाखान मागे धरणगाव ता.धरणगाव, ३) बलदेवसिंग बापुसिंग जुनी वय २२ रा. सरकारी दवाखाना मागे, धरणगाव ता. धरणगाव यांना पुढील तपास कामी पहूर पो.स्टे. च्या ताब्यात देण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.