आशियाई पॅरा स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंनी केली 111पदकांची कमाई

0

 

बीजिंग ;- चीनमध्ये पार पडलेल्या आशियाई पॅरा खेळ (Asian Para Games 2023) स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी शानदार कामगिरी केली आहे. एशियन पॅरा गेम्स स्पर्धेचा चौथा आणि शेवटचा दिवस भारतासाठी अविस्मरणीय ठरला आहे.

भारतीय खेळाडूंनी या स्पर्धेत शंभर नंबरी कामगिरी केली आहे. आशियाई पॅरा गेम्स 2023 मध्ये भारतीय खेळाडूंनी एकूण 111 पदकांची कमाई केली आहे. यामध्ये 29 सुवर्णपदकं, 31 रौप्यपदकं आणि 51 कांस्यपदकांचा समावेश आहे.

भारताने स्पर्धेच्या चौथ्या आणि शेवटच्या दिवशी चार सुवर्णपदके, दोन रौप्यपदके आणि सहा कांस्य पदकांसह 12 पदके जिंकली. आशियाई पॅरा गेम्समध्ये भारताने पहिल्यांदाच 100 पदकांचा टप्पा गाठला आहे. ही भारताची आशियाई पॅरा गेम्समधील आतापर्यंतची सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे. यापूर्वीची 2018 मध्ये भारताने 72 पदके जिंकली होती, ज्यामध्ये जेव्हा 15 सुवर्ण, 24 रौप्य आणि 33 कांस्य पदकांचा समावेश होता.

Leave A Reply

Your email address will not be published.