जी. एच. रायसोनी विद्यालयात “प्रथम वर्ष अभियांत्रिकी”ची प्राध्यापक-पालक सभा संपन्न

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव, ता. २८ : येथील जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयातील प्रथम वर्ष अभियांत्रिकी विभागात प्राध्यापक-पालक सभा उत्साहात संपन्न झाली. सदर सभेसाठी जी. एच. रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल या प्रमुख मार्गदर्शक म्हणून व्यासपीठावर उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या सुरवातीला सभेचे समन्वयक व प्रथम वर्ष अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. जितेंद्र वडद्कर यांनी आपल्या प्रास्ताविकेत पालक सभेच्या आयोजनाचा उद्देश व हेतू स्पष्ट केला. तसेच महाविद्यालयाचा वार्षिक अहवाल सादर केला. यानंतर उपस्थित पालकांना मार्गदर्शन करतांना रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी नमूद केले कि, जी. एच. रायसोनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना नियमित शिक्षणासोबतच कौशल्य आधारित शिक्षण मिळावे आणि नवीन कौशल्य आधारित तांत्रिक शिक्षणाचा विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्धीसाठी उपयोग व्हावा हा मुख्य उद्देश समोर ठेवून विविध उद्योग केंद्रासोबत रायसोनी इस्टीट्युटने सामंजस्य करार केला आहे. मुळात आजच्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये विद्यार्थ्यांची प्रगती उत्तम असून तंत्रज्ञानाबाबत त्यांना बऱ्याच गोष्टी न शिकवता ते स्वतः शिकतात. हीच बाब त्यांनी अभ्यासातही केली पाहिजे.

विद्यार्थ्यांच्या सोयी तसेच शैक्षणिक सुविधा व रोजगाराभिमुख शिक्षणाविषयी मार्गदर्शन केले. त्यांनी अभियांत्रिकी क्षेत्रातील विविध उपलब्ध संधीची माहिती दिली. तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करणे हि आपली सर्वांची नैतिक जबाबदारी असून स्वायत्त जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालयात यावर्षापासूनच मेजर-मायनर प्रोग्राम, अॅकड्मिक बँक ऑफ क्रेडीट व मल्टी डिसीप्लिन अॅप्रोच आदीची सुरुवात झाल्याने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण- २०२० च्या दिशेने आमच्या महाविध्यालयाचे मार्गक्रमण सुरु झाल्याचे सांगत या धोरणामुळे शैक्षणिक संस्था, विद्यार्थी, शिक्षक, व्यवस्थापन सर्वांचेच उत्तरदायीत्व वाढणार असून थोडक्यात तंत्रज्ञानाचा आधार घेत संशोधन आणि प्रयोगशिलतेद्वारे देशाला प्रगती पथावर नेण्याचे उद्दिष्ट या शैक्षणिक धोरणाद्वारे साध्य केले जाणार आहे असे त्यांनी नमूद केले. पालकांनी महाविद्यालयाची शिक्षणपद्धती तसेच उपक्रमांबद्दल समाधान व्यक्त करत त्याचा विद्यार्थ्यांना फायदा होत असल्याचे नमूद केले.सभेच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. स्वाती बाविस्कर, प्रा. प्रियांका बर्डे, प्रा. श्रीराम अग्रवाल यांनी सहकार्य केले. सदर पालक सभेचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्यूटचे अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनी यांनी अभिनंदन केले

Leave A Reply

Your email address will not be published.