एरोबिक्स जिम्नॅस्टिक्स राष्ट्रीय स्पर्धेसाठी एकलव्यच्या खेळाडूंची निवड

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

केसीई सोसायटीच्या एकलव्य क्रीडा संकुलातील एकलव्य जिम्नॅस्टिक्स अकॅडमीमध्ये सराव करणाऱ्या 5 खेळाडूंची 17व्या एरोबिक्स जिम्नॅस्टिक्स राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. डेरवण, जिल्हा रत्नागिरी येथे झालेल्या 22व्या एरोबिक जिम्नॅस्टिक्स राज्य अजिंक्यपद स्पर्धेमधून सदर खेळाडूंची निवड करण्यात आलेली आहे. या राष्ट्रीय स्पर्धा दि. 28 ते 31 मार्च 2023 दरम्यान गोपालन स्पोर्ट्स सेंटर, बँगलोर येथे होत आहेत. सदर स्पर्धा या भारतीय जिम्नॅस्टिक्स संघटनेच्या मान्यतेने होणार आहेत.

एकलव्य जिम्नॅस्टिक्स अकॅडमीचे हे खेळाडू या स्पर्धेमध्ये 11 वर्षाखालील व 14 वर्षाखालील वयोगटामध्ये सहभागी होणार आहेत. यापैकी साची इंगळे या खेळाडूची सलग तिसऱ्यांदा राष्ट्रीय स्पर्धेकरीता निवड झाली आहे. हे सर्व खेळाडू एरोबिक जिम्नॅस्टिक्सचे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक डॉ. निलेश जोशी यांच्या मार्गर्शनाखाली सराव करतात. या यशाबद्दल केसीई सोसायटीचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे, कोषाध्यक्ष डी. टी. पाटील, क्रीडा संचालक डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर, जळगाव जिल्हा जिम्नॅस्टिक्स संघटनेचे सचिव प्रवीण पाटील, अक्षय सोनवणे तसेच पालकांनी खेळाडू व प्रशिक्षकांचे अभिनंदन केले.

निवड झालेले खेळाडू:

माही फिरके, आयुष वंजारी (मिश्र दुहेरी)

साची इंगळे, अनुष्का चौधरी व गायत्री देशपांडे (मिश्र तिहेरी)

Leave A Reply

Your email address will not be published.