दुचाकी व एस’टी बसच्या भीषण अपघातात वृद्ध ठार ,तरुण गंभीर

0

कजगाव ता.भडगाव : – एसटी बस आणि दुचाकीच्या अपघातात ६० वर्षीय वृद्ध ठार तर तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना येथील पारोळा चौफुलीवर शनिवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली .

सूत्रांची दिलेली माहिती अशी कि , दुपारी दोनच्या सुमारास निंबा भिवसन कोळी वय ६० वर्ष राहणार गुढे ता,भडगाव व प्रसाद रवींद्र चौधरी वय १६ वर्ष रा. पिलखोड ता, चाळीसगांव हे दोघे दुचाकीस्वार गाडी नंबर एम. एच.१९ ऐ.एफ.३१२८ ने गोंडगाव कडून कजगाव कडे येत असतांना त्यांना पुणे एरंडोल ह्या कजगाव कडून भडगावकडे जाणाऱ्या एस. टी. बस क्रमांक एम.एच .२० बी.एल.२६५२ ह्या दोघा वाहनांची जोरदार धडक झाली त्यात दोन्ही दुचाकीस्वार हे गंभीर जखमी झाले होते . त्यांना ग्रामस्थ व नातेवाईकांनी रुग्णवाहिकेच्या माध्यमातून चाळीसगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले . मात्र निंबा कोळी यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना धुळे येथे पुढील उपचारासाठी हलवण्यात आले . रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला . तर अपघातातील तरुणाची ही प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे . पारोळा चौफुलीवर झालेल्या जोरदार अपघातामुळे काही वेळ वाहतूकीची कोंडी झाली होती. तर अपघातामुळे मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याचे दिसून आले.

Leave A Reply

Your email address will not be published.