नरभक्षक बिबट्याचा धुळ्यात हौदोस, बालकाचा उपचारादरम्यान मृत्यू

0

धुळे, लोकशाही न्यूज नेटवर्क

धुळ्यात गेल्या आठ दिवसांपासून नरभक्षक बिबट्याचा हौदोस सुरु होता. यापूर्वी २ बालकांवर या नरभक्षक बिबट्याने हल्ला केला होता. या हल्ल्यात दोन बालके जागीच मृत्युमुखी पडल्याचे घटना उघड झाली आहे. त्यानंतर आता बिबट्याने हल्ला केलेल्या तिसऱ्या बालकाचा देखील उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

सविस्तर माहिती अशी की, धुळे तालुक्यातील मोहन शिवारात रमेश नरसिंह दुडवे हा ९ वर्षांचा मुलगा आपल्या परिवारासोबत झोपला होता. रात्रीच्या वेळी बिबट्याने अचानक त्याच्यावर हल्ला केला व त्याला शेतात ओढून नेले, कुटुंबियांच्या लक्षात आल्यानंतर कुटुंबियांनी आरडाओरड केली. त्यानंतर बोबत्याने बालकाला त्याच ठिकाणी टाकून पाल काढला. बिबट्याच्या या हल्ल्यात बालकाच्या अंगावर मोठ्या प्रमाणात जखमा झाल्याने त्यास तात्काळ शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता, त्याचा आज उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला.

दरम्यान, याआधी सुद्धा धुळे तालुक्यातील नंदाळे बुद्रुकमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात लहान मुलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर तालुक्यातील बोरकुंड येथील सहा वर्षीय मुलगा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.